सौ.सुनंदा बबनराव आवताडे
मंगळवेढा शहर स्वच्छ, स्मार्ट व प्रगत बनविण्याचा संकल्प आहे
त्यासाठी पारदर्शक प्रशासन देणे हे माझे मुख्य ध्येय आहे.
पण हा विकास केवळ माझ्या एकटीने शक्य नाही, त्यासाठी तुमच्या सक्रिय सहभागाची नितांत गरज आहे.
मनोगत
सौ.सुनंदा बबनराव आवताडे
"मंगळवेढ्याच्या पवित्र भूमीने आपल्याला नेहमीच समता आणि स्वाभिमानाची शिकवण दिली आहे. आज नगराध्यक्षा म्हणून काम करताना, जनतेच्या स्वाभिमानाची जपणूक करणे आणि शहराचा सर्वांगीण विकास साधणे हीच माझी प्राथमिकता आहे.
शहराचा विकास केवळ नगराध्यक्षांच्या कल्पनेतून नाही, तर नागरिकांच्या सक्रिय सहभागातून पूर्णत्वास जातो. तुमची एक उत्तम सूचना शहराचे चित्र पालटू शकते. लक्षात ठेवा, विकासाच्या पर्वात तुमचे योगदान मोलाचे आहे!
चला, मंगळवेढा असे शहर बनवूया जिथे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल, प्रत्येकाला प्रगतीची समान संधी मिळेल आणि आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपला जाईल.
प्रमुख उपक्रम
स्मार्ट सिटी २.०
भूमिगत गटारी, रस्ते रुंदीकरण, पाणीपुरवठा सुधारणा आणि स्मार्ट शहर सुविधा आणण्यासाठी प्रयत्न.
डिजिटल शाळा
शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड व टॅब्लेट. प्रशस्त व अत्याधुनिक वर्ग खोल्या. प्रत्येक खेळासाठी उत्कृष्ट साधने उपलब्ध करणे
आरोग्य अभियान
प्रभागांमध्ये उपलबद्धतेनुसार महिलांसाठी आरोग्य उपकेंद्र बनवणे. तसेच सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी लॅब बनवणे.
महिला सबलीकरण
महिला प्रशिक्षण केंद्र स्थापना. बचत गटांना प्रोत्साहन आणि महिला उद्योजकतेला चालना.
स्वच्छ मंगळवेढा अभियान
आधुनिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प. नागरिकांच्या सहभागातून प्लास्टिकमुक्त प्रभाग, स्वच्छता मोहीम राबवणे